• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2026
in गुन्हे
0
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

​रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलीस ठाणे हद्दीतील एका खळबळजनक खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना रावेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना १७ जुलै २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३० वर्ष, रा. ऐनपूर, ता. रावेर) याच्या खुनाची फिर्याद त्याचा लहान भाऊ शेख सलमान शेख शब्बीर याने १२ जुलै २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी गणेश विजय उर्फ संजय घोरपडे (वय २५, रा. भोर रेल्वे स्टेशनजवळ, रावेर) याचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मयताची आई आजारी असल्याने ते घराबाहेर असताना आरोपीने मयताच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

यामुळे संतापलेल्या मयताने आणि त्याच्या आईने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
​याच वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय ३१, रा. भोर रेल्वे स्टेशनजवळ, रावेर) या दोघांनी संगनमत करून मयताला दारू पाजली. त्यानंतर ९ जुलै ते ११ जुलैच्या दरम्यान नांदुरखेडा शिवारातील एका शेतात गळा दाबून त्याचा खून केला व मृतदेह टाकून पळ काढला.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने माग काढून २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना जेरबंद केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: CrimeJalgaonPoliceRaver
Next Post
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add