• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 9, 2026
in गुन्हे
0
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी ५ अट्टल आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून ५ आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये टोळीचा मुख्य मोहरक्या गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६), दीपक बापू पाटील (वय २३), राजेश माणिक राठोड (वय २४), सुमित संजय कोळी (वय १९) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४) सर्व रा. जळगाव यांचा समावेश आहे.

​ताब्यात घेतलेल्या आरोपींनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ९ घरफोड्या आणि १ मोटार वाहन चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा घरफोडीतील मुद्देमाल आणि २ लाख रुपये किमतीच्या ४ मोटार सायकली असा एकूण ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते, ज्याला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीण गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोफेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, पोहेकॉ प्रदीप राजपूत तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दिपक देवरे आणि वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील व पंकज देशमुख या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add