• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : रंगभूमीवरील कलावंतांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले होते. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

​शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून आरोग्य तपासणीला अधिकृत सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. स्वाती बाविस्कर, मुकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी, सचिन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

​या शिबिरात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांची आरोग्य तपासणी केली. तसेच त्यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी आणि औषधोपचार घेताना पाळावयाचे नियम याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.

​विविध चाचण्यांसह औषधांचे मोफत वितरण..
शिबिरादरम्यान डॉ. स्वाती बाविस्कर, डॉ. हर्ष चौधरी, राहुल बनसोडे व अरुश्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांच्या पथकाने सहभागी कलावंतांची सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर), रक्तदाब (बीपी) आणि ईसीजी (ECG) यांसारख्या महत्त्वाच्या शारीरिक तपासण्या केल्या. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक त्या औषधांचे विनामूल्य वितरणही करण्यात आले. शहरातील एकूण ३८ कलावंतांनी या आरोग्य शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन विनोद ढगे यांनी केले. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी बालरंगभूमी परिषदेचे दीपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी आणि राहुल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे कलावंत वर्गातून कौतुक होत आहे.

Next Post
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add