• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

​जळगाव, (प्रतिनिधी): जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहरुख खान सलीम खान (वय २६, रा. इंद्रप्रस्थ नगर, पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी दस्तगीर अल्लाउद्दीन पिंजारी (वय ४३, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार, २९ जून २०२६ च्या रात्री ९ ते ३० जून २०२६ च्या पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून २५,००० रुपये किमतीची ग्रे रंगाची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल चोरी केली होती.

तसेच, साक्षीदार रिजवान अजहर खान यांच्या मालकीच्या ‘चोरीरी इंटरप्रायझेस’ नावाच्या भंगार खरेदी-विक्री दुकानाचे शटर उचकावून आत ठेवलेले ६,३०० रुपये किमतीचे ९ किलो वजनाचे पितळाचे बारीक तुकडे व पिनाचे बटन चोरून नेले होते. या तक्रारीवरून जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपासाबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या. त्यानुसार प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

​गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान, पथकाला त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा सुप्रीम कॉलनीतील रहिवासी शाहरुख खान सलीम खान याने केला आहे. मिळालेल्या माहितीची पडताळणी करत पोलिसांनी तत्परतेने संशयित आरोपी शाहरुख खान याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली २५,००० रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल (क्र. MH-१९-BC-५१६२) जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील करत आहेत.​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.हे.कॉ. गिरीश दिलीप पाटील, पो.हे.कॉ. प्रमोद लांडगेसरी आणि पो.ना. मोतीलाल बोरसे या पथकाने केली आहे. पथकाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Next Post
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add