• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

कामगारांची सेवा आणि कर्तव्याची ३७ वर्षे! आर. के. पाटील यांचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 1, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा एसटी महामंडळाचे लिपिक (स्थापत्य शाखा) आर. के. पाटील यांचा ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतरचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा जळगावात अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. २६ जून रोजी येथील संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात आयोजित या दिमाखदार सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आर. के. पाटील यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

​याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे महामंडळ असून ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. एसटी ही महाराष्ट्राची केवळ जीवनवाहिनी नसून रक्तवाहिनी आहे. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ ही शासकीय संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे खरे श्रेय ऊन-पावसाची तमा न बाळगता सर्व जाती-धर्माच्या प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनाच जाते.” आर. के. पाटील यांनी महामंडळात ३७ वर्षे निष्कलंक सेवा देतानाच कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगत ना. पाटलांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

​या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि एसटी महामंडळातील अनेक दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती. व्यासपीठावर खासदार स्मितात वाघ, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), महापौर दीपमाला काळे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, माजी उपमहाव्यवस्थापक सोपानराव नाबदे, आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर उपस्थित होते.

​तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरण बिडवे, संघटक सचिव सुभाष जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख, सुरेश चांगरे, गोपाल पाटील, विनोद शितोळे, प्रशांत मोरे, सागर निकुंभ, खुशाल मोरे, शैलेश नन्नवरे यांच्यासह एसटी महामंडळ जळगाव विभागातील सर्व अधिकारी आणि आजी-माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसटी महामंडळातील सर्व युनियनचे पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. बी. महाजन यांनी केले.


 

Next Post
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add