• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 1, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील चैतन्य नगर भागात कार्यरत असलेल्या ’बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा’ १८ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन, प्रार्थना आणि बहिणाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ईनामदार, अरुण थोरात, तसेच उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक क्षेत्राचे डॉ. मालेगावकर आणि अध्यक्ष पी. डी. चौधरी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा आशा रघुनाथ तळेले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. विविध उपक्रम आणि सत्कार सोहळावर्धापन दिनाचे औचित्य साधून महादेव हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्येष्ठ महिलांसाठी मोफत आरोग्य, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचा १३० महिलांनी लाभ घेतला. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या नवनियुक्त व कार्यकारी मंडळातील सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या वतीने सामाजिक संदेश देणारा ’मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या विषयावर आधारित भारुडाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या भारुडाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबवल्या जाणार्‍या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला. सूत्रसंचालन श्रीमती पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शारदा खडके यांनी मानले.

पसायदान आणि सामुदायिक घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव रजनी सुरेश महाजन, खजिनदार कौसल्या मनोहर पाटील, कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य आणि चैतन्य नगर संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Next Post
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add