• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : बालरंगभूमीवर आपले संपूर्ण आयुष्य जगणारे, आपल्या अष्टपैलू कलेने असंख्य बालकलावंत घडविणारे आणि बालप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जळगावचे नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीची आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी (दि. ३०) रोजी जळगावात व.वा.वाचलनालयाच्या रामनारायण सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता ‘शोकसभा’ आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व समस्त जळगावकर नाट्यकर्मींतर्फे करण्यात आले आहे.

स्मृतिप्रित्यर्थ विनामूल्य आरोग्य शिबिर..
स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात येणार असून, हे शिबिर (दि. ३० जून) सकाळी ८:०० ते १०:०० वाजेदरम्यान अरुश्री हॉस्पिटल, तळमजला, महेश प्रगती हॉलजवळ, रिंगरोड, जळगाव येथे होणार आहे.

हे आरोग्य तपासणी शिबिर सर्व नाट्यकलावंत व त्यांच्या कुटुंबियांसाठी पूर्णपणे विनामूल्य राहील. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव, अरुश्री हॉस्पिटल व मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add