• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरसोली येथील घटना; कायदा सुव्यवस्था ढासळली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2026
in गुन्हे
0
जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : शिरसोली गावातील जुन्या भांडणाचा राग मनात धरून दापोरा येथील एका तरुणासह त्याच्या मित्रांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची आणि चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ जून रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. स्मशानभूमीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) या तरुणाने रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी (सर्व रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विशाल पाटील हा सुप्रीम कंपनीत मजुरीचे काम करतो. २६ जून रोजी रात्री तो त्याचे मित्र रोशन मधुकर लांबोडे आणि ललित ज्ञानेश्वर भोई यांच्यासोबत रोशनच्या पल्सर मोटारसायकलने शिरसोलीवरून दापोरा येथे जात होता. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिरसोली स्मशानभूमीजवळून जात असताना संशयित विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी यांनी त्यांना रस्त्यात अडवले.

२५ जून रोजी रात्री गावात दर्शन देवरे, रवी मिस्तरी आणि मयुर भोई, प्रेम सोडव यांच्यात झालेल्या भांडणात तुम्ही देखील होतात, अशी कुरापत संशयितांनी काढली. त्यांनी विशाल आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान संशयित दीपक भिल याने त्याच्याजवळील चॉपरने विशाल पाटील याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कोपरावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच तिघांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यानंतर विशाल आणि त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. गावातील शुभम सोनवणे यांनी जखमी विशालला तातडीने जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: CrimeJalgaonPoliceshirsoli
Next Post
शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add