• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 25, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

जळगाव, (प्रतिनिधी) : नूकतेच रूजू झालेले हृदयविकार तज्ञ डॉ. अदनान अली यांच्या सेवेची दमदार यशस्वी सूरूवात झाली असून विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या चार रुग्णांवर एकाच दिवशी यशस्वी एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयालयाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली व त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या प्रयत्नांमुळे चारही रुग्णांना नवजीवन मिळाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर व समाधानकारक आहे.

हृदयविकाराशी संबंधित विविध तक्रारी घेऊन चार रुग्ण उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. काही रुग्णांना छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, चालताना दम लागणे आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जाणवत होती. रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने हृदयालयात दाखल करण्यात आले. हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांनी रुग्णांची सखोल तपासणी केली.

त्यानंतर एन्जिओग्राफीसह आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमधून चारही रुग्णांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अडथळे असल्याचे निदर्शनास आले. या अडथळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला होता. रुग्णांची स्थिती आणि तपासणी अहवालांचा अभ्यास केल्यानंतर तातडीने एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदयालयातील अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांच्या समन्वयातून चारही रुग्णांवर यशस्वी एन्जिओप्लास्टी करण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या किंवा अरुंद झालेल्या धमन्यांमध्ये स्टेंट बसवून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला.शस्त्रक्रियेनंतर चारही रुग्णांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ल्यासह पुढील उपचार देण्यात येत आहेत.

▪️अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि वेळेवर उपलब्ध होणारे उपचार यामुळे परिसरातील हृदयरुग्णांसाठी हे हृदयालय आशेचा किरण ठरत आहे. हृदयविकाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा जाणवणे याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास गंभीर धोके टाळता येतात.
-डॉ. अदनान अली, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add