• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 23, 2026
in सामाजिक
0
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रविवारी (दि. २१) शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे भव्य वह्या व दप्तर वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या १,००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

​बॅनरबाजीला फाटा, समाजउपयोगी उपक्रमाला प्राधान्य..
आमदार राजूमामा यांनी यंदा आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची जाहिरात, होर्डिंग किंवा बॅनरबाजी न करता, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘वह्यादान’ करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,००० वह्यांचे संकलन केले.

​या साहित्याचे वाटप भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे आणि विविध नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन मिलिंद गोविंद चौधरी व उदय भालेराव यांनी केले होते.

​नवीन शैक्षणिक वर्ष आणि शाळा सुरू झाल्या-झाल्याच हक्काचे दप्तर आणि वह्या मिळाल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील असंख्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमदार राजूमामा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी यांसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post
प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add