• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

​पाचोरा, (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मी अंगण कॉलनी भागात भरदिवसा घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली खेळण्यातील पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दि.१२ जून २०२६ रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सातगाव डोंगरी येथील रहिवासी सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२) या पाचोरा येथील लक्ष्मी अंगण कॉलनीतील आपल्या राहत्या घरी असताना ही घटना घडली होती. ‘तुमचे ॲमेझॉनचे पार्सल आले आहे’ असे खोटे सांगून अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला.

आरोपींनी फिर्यादी कुसुमबाई, त्यांच्या दोन मुली व मुलाला खाटेवर एका ठिकाणी डांबले. “तुमच्याकडील सोन्याच्या चिपा लवकर काढून द्या, नाहीतर तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी देत खेळण्यातील पिस्तुलचा धाक दाखवला. त्यानंतर कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेले ७,००० रुपये आणि मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये असा एकूण ७,७०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या सूचनेवरून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. अवघ्या २४ तासांत म्हणजेच दि.१३ जून रोजी मुख्य आरोपी चेतन उर्फ जितु प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण गुन्ह्याचा मास्टरमाइंड त्याचा मामा गोकुळ महादु वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी) असल्याचे निष्पन्न झाले.

गोकुळ वाघ याला फिर्यादीच्या पाचोरा येथील घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती मिळाली होती. त्याने ही माहिती त्याचा मित्र नितीन पाटील (रा. पाचोरा) याला दिली. नितीन पाटील याने त्याच्या ओळखीच्या दोन इसमांना बोलावून घेतले व मुख्य आरोपी चेतन भुतेकर याच्यासोबत पाठवून ही घरफोडी घडवून आणली. ​पोलिसांनी तपासादरम्यान मुख्य आरोपीसह त्याचे इतर दोन साथीदार योगेश परश्राम शिंदे (वय ३१, रा. दर्शन कॉम्प्लेक्स, सातपूर, नाशिक) आणि गोकुळ महादु वाघ यांना निष्पन्न करून अटक केली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यातील ७,७०० रुपयांची रोकड आणि धाक दाखवण्यासाठी वापरलेली नकली खेळण्यातील पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चोरीचा कट रचणारे आरोपी क्र. २ गोकुळ वाघ आणि नितीन पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग समोर आला असून पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा बापुसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि कृष्णा घायाळ, सपोनि विलास पाटील, पोकों योगेश पाटील, हरिश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम, शिंपी, नितीन भालेराव यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि कृष्णा घायाळ करत आहेत.


 

Tags: #pachoraCrimeJalgaonPolice
Next Post
‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add