• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर १९ जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे आज दि.१९ ला संध्याकाळी ४ वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹२,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-२ मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹२,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260619-WA0016.mp4

PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹१५ हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते. देशभरात दोन वर्षांत ३.५ कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ७५,७११ कर्मचाऱ्यांना ₹४२.७९ कोटींपेक्षा अधिक लाभ, तर ६,३५१ नियोक्त्यांना ₹१४५.१६ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे.

देशभरातील २०० ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात ९ हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि ४५ हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-२ मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.


 

Next Post
चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात; एकूण ३ मोटारसायकली जप्त

चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात; एकूण ३ मोटारसायकली जप्त

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add