• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात; एकूण ३ मोटारसायकली जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात; एकूण ३ मोटारसायकली जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून, एका संशयितासह एकूण ३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.

​पहिली कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पथकातील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगाव येथील रहिवासी राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने एक ‘एचएफ डिलक्स’ मोटारसायकल चोरी केल्याची खात्रीशीर माहिती समोर आली.

​या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल भिसे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून एक ‘हौंडा युनिकॉर्न’ मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. तसेच चोरीच्या ‘एचएफ डिलक्स’ मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने ती मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला २०,००० रुपयांत विकल्याची कबुली दिली. आरसी बुक मागितल्यावर ‘नंतर देतो’ असे सांगून त्याने टाळाटाळ केली होती. पोलिसांनी प्रशांत राजपूत यालाही ताब्यात घेतले असून या कारवाईत ८०,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

​दुसरी कारवाई: संशयास्पद फिरणारा तरुण विनानंबर गाडीसह पोलिसांच्या जाळ्यात..
​गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७ वर्षे, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत विचारले असता त्याने कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून २५,००० रुपये किमतीची ‘यामाहा कंपनीची FZ’ मोटारसायकल जप्त केली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयितासह ती चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि चाळीसगाव विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ​स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पो.उप-निरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ भूषण पाटील व सर्व नेमणूक स्था.गु.शा. जळगाव या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.


 

Tags: chalisgaonCrimePolice
Next Post
जैन हिल्स येथे ‘फ्रूटफुल इंडिया’ प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात

जैन हिल्स येथे 'फ्रूटफुल इंडिया' प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add