• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

जिल्ह्यातील ५०० हून अधिक नगरसेवकांचा महायुतीच्या विजयाचा संकल्प !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in राजकीय
0
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

जळगाव, (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी आपला मुख्य भर दिला आहे. महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याने महाजन यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूने..
या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट आणि भक्कम बहुमत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मतदारसंघात पक्षीय बलाबल भारतीय जनता पक्षाचे २५२, शिवसेना शिंदे गटाचे १८६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ३५ नगरसेवक जिल्ह्यात आहेत.

या सर्व ४७३ हून अधिक नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा आणि त्यांना घवघवीत बहुमताने विजयी करण्याचा ठाम संकल्प केला आहे.

कृषी क्षेत्राचा प्रगल्भ अभ्यास आणि ‘केळी’ उत्पादकांसाठी नवी आशा..
नंदकिशोर महाजन यांची ओळख कृषी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे. शेतीमधील विविध आधुनिक संकल्पनांवर आणि तंत्रज्ञानावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे.

“नंदकिशोर महाजन हे विधानपरिषदेच्या माध्यमातून आगामी काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणतील आणि केळी पिकाला सोन्याचे दिवस मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील,” अशी आशा संपूर्ण जिल्हावासीयांना लागून आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना मिळणार वाचा..
केवळ शेतीच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या विविध समस्यांची महाजन यांना जाण आहे.

विधानपरिषदेच्या सभागृहात महाजन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर नक्कीच आवाज उठवतील आणि त्याचा थेट फायदा जनविकासासाठी होईल, असा विश्वास मतदारसंघातील नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. महाजन यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांची विजयी घोडदौड सुसाट सुरू असल्याचे दिसत आहे.


 

Tags: Bjp
Next Post
व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add