• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 14, 2026
in सामाजिक
0
वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

​जळगाव, (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स-बॅनर्स, डीजे आणि महागड्या पार्ट्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची स्पर्धा सुरू असताना, जळगावमधील तरुण उद्योजकांनी मात्र सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श पायंडा पाडला आहे.

अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘जीपीएस मित्र परिवार’ या संस्थेला एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत केली. यामध्ये यश मंत्री यांनी ७१ हजार रुपये तर अमोल कासट यांनी १ लाख रुपयांचा निधी संस्थेचे सर्वेसर्वा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

​दिखाव्यापेक्षा गरजू घटकांना मदत केल्याने मिळणारे समाधान चिरंतन असते, या भावनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या वाचवलेल्या निधीतून ‘जीपीएस मित्र परिवारा’च्या वतीने आगामी काळात गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, त्यांची शैक्षणिक फी भरणे, अनाथाश्रमात अन्नधान्य व कपडे देणे, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदत करणे, तसेच वृक्षारोपण, रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.

वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत समाजातील दुर्लक्षित घटकांना मोठा आधार देणाऱ्या यश मंत्री आणि अमोल कासट यांच्या या अनोख्या पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘जीपीएस मित्र परिवारा’तर्फे त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत
सामाजिक

वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

June 14, 2026
कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान
शैक्षणिक

कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान

June 14, 2026
‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!
जळगाव जिल्हा

‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

June 13, 2026
सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई
गुन्हे

सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

June 13, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!

June 13, 2026
लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी

June 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group