• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 30, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

जळगाव, (प्रतिनिधी) : आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या संघांत होणार असून या लढतीचा थरार जळगावकरांना मोठ्या पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडेमी व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण काव्यरत्नावली चौक येथे रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून दाखविले जाणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

देशात सध्या आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धेची धूम असून या स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या संघात होणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे. हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी जळगाव शहरातील जैन स्पोर्ट्स अकॅडेमी, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून अंतिम सामना १० बाय २० फूट अशा मोठ्या एल.ई.डी. स्क्रीनवर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था केली आहे. ही सामन्याच्या सुरुवातीपासून ते सामना संपेपर्यंत केली आहे.

आकर्षक आतषबाजीसह सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी..
सामन्याचा आनंद घेताना क्रिकेटप्रेमींना डीजेवरील गाण्यांचा, पंजाबी ढोल तसेच आकर्षक आतषबाजीचादेखील आनंद घेता येणार आहे. सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

आय.पी.एल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार सुट्टीच्या दिवशी आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हा अंतिम सामन्याचा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी पर्वणीच मिळाली आहे. जास्तीत जास्त जळगावकर नागरिक व क्रिकेटप्रेमींना या ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #sports
Next Post
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

ताज्या बातम्या

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group