• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 30, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

​चोपडा, (प्रतिनिधी) : शहरातील प्रताप हायस्कूल आणि तहसील कार्यालयाच्या पाठीमागील स्मशानभूमी रस्त्यालगत सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ पीडित महिलांची सुटका केली असून दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित ९ जण फरार झाले आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे, २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास प्रताप हायस्कूल आणि तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील स्मशानभूमी रस्त्यालगत पोलिसांनी अचानक छापा टाकला. या ठिकाणी संशयित महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय देऊन, त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

​या कारवाई दरम्यान पोलिसांनी ज्या ६ महिलांची सुटका केली, त्या प्रामुख्याने राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पीडित महिलांना सध्या कायदेशीर संरक्षण देण्यात आले असून, त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा समाजघातक गुन्ह्यांविरुद्ध पोलिसांची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


 

Tags: chopdaCrimeJalgaonPolice
Next Post
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add