• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

शासकिय योजनेसोबत कॅशलेस सुविधा देखिल उपलब्ध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 28, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

जळगाव, (प्रतिनिधी) : मेंदू आणि मज्जासंस्थेशी संंधित गंभीर आजारांवर समग्र व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत महादेव हॉस्पिटल येथे २४ तास आपत्कालीन सेवेसह अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभाग कार्यरत करण्यात आला आहे. यासाठी शासकिय योजना व कॅशलेस उपचाराची देखिल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यात मल्टीपॅरामीटर मॉनिटरिंग, आयसीपी मॉनिटरिंग, इइजी व्हेंटिलेटर केअर तसेच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्याधुनिक अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय न्यूरो-रिहॅलिटेशन अंतर्गत फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि दीर्घकालीन पुनर्वसन नियोजनाचीही सुविधा रुग्णांना मिळणार आहे. स्ट्रोक (लकवा) व्यवस्थापन, इस्केमिक व हेमोरॅजिक स्ट्रोकवरील त्वरीत उपचार, थ्रोम्बोलायसिस, प्रगत अतिदक्षता काळजी, मेंदूतील रक्तस्त्राव, अ‍ॅन्युरिजम, अपस्मार (एपिलेप्सी), मेंदूचे झटके, मणक्याचे आजार, स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी, तीव्र डोकेदुखी व मायग्रेन, मेंदूज्वर आणि मेंदूतील संसर्गांवर विशेष उपचार सुविधा देण्यात येत आहेत.

या विभागाचे मुख्य सल्लागार डॉ. कमलेश तायडे एमडी मेडीसिन व एम्स रूग्णालय नवी दिल्ली येथून न्युरोलॉजी शिक्षण घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपचार सेवा दिल्या जात आहेत. तसेच डॉ. हितेश मोरे आणि डॉ. आशिक शेख हे योजना समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. या सुविधेमूळे अनुभवी न्यूरोलॉजिस्ट व क्रिटिकल केअर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तात्काळ व सुरक्षित उपचार दिले जाणार आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय विमा योजनांअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. मेंदूच्या प्रत्येक समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार हे उद्दिष्ट ठेवून महादेव हॉस्पिटलतर्फे आधुनिक न्यूरोलॉजी सेवा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Next Post
कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add