• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापालिकेतर्फे वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरींचा खळबळजनक आरोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
महापालिकेतर्फे वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरींचा खळबळजनक आरोप

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महापालिकेत कचऱ्याचे वजन करण्यासाठी वजनकाटा बसवताना आणि त्याच्या देखभालीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश डावलून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, यात एकूण ७ लाख ५८ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली आहे.

​कमी क्षमतेचा काटा, जास्त खर्च..
शासनाने ५० टन क्षमतेचा वजनकाटा ५ लाख ७१ हजार रुपयांत बसवण्याचे निर्देश दिले असताना, मनपाने तब्बल ९ लाख ५० हजार रुपये खर्च करून केवळ ३० टन क्षमतेचे दोन वजनकाटे बसवले. टी.बी. हॉस्पिटल आणि कचरा डेपो येथे हे काटे बसवण्यात आले होते. त्यापैकी टी.बी. हॉस्पिटल येथील काटा ई-बस चार्जिंग स्टेशनमुळे काढण्यात आला, मात्र तो सध्या कुठे आहे याचे उत्तर अधिकारी देत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून हा काटा बंद असल्याने खासगी वजनकाट्यावर कचऱ्याचे वजन केले जात आहे. यासाठी मागील ६ ते ७ महिन्यांत खासगी काटा मालकाला १३ लाख ३७ हजार रुपये मोजण्यात आले असून आणखी काही महिन्यांचे बिल देणे बाकी आहे.

कचरा डेपोवरील मनपाचा स्वतःचा काटाही अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ३ लाख ९७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असताना, मनपाकडे स्वतःचा काटा दुरुस्त करायला पैसे नाहीत; मात्र खासगी चालकाला लाखो रुपये देण्यासाठी पैसे उपलब्ध आहेत. खासगी काट्यावर वजन केल्यास भ्रष्टाचार करणे सोपे जाते, म्हणूनच अधिकारी जाणूनबुजून स्वतःचा काटा दुरुस्त करत नसल्याचा आरोप उपमहापौरांनी केला आहे. इतका मोठा खर्च खासगी व्यक्तीवर करण्यापेक्षा मनपाने स्वतःचे दोन नवीन काटे बसवले असते, असा सवाल त्यांनी केला.

​आरोग्य विभागाच्या संगणमताने कर्मचारी गायब..
याशिवाय, मनपा इमारतीमधील ८ कर्मचाऱ्यांपैकी २ कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून कोणतीही रजा न घेता बेकायदेशीरपणे गैरहजर आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन मुकादम असतानाही कोणतीही कारवाई झालेली नाही. हा सर्व प्रकार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, मनपा आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर मनोज चौधरी यांनी केली आहे.

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add