• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 20, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

​जळगाव, (प्रतिनिधी) : अवैध सावकारी प्रकरणी अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि पुढील सुनावणीची तारीख देण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील उपनिबंधक (सहकार खाते, वर्ग-१) जगदीश बाबूराव बारी आणि त्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणारा खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे जळगावच्या सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

​तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि चौकशी अहवाल अनुकूल पाठवावा, यासाठी उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (वय ५६, रा. भुसावळ) यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ मे २०२६ रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.

​एसीबीने १८ मे रोजी केलेल्या पडताळणीत उपनिबंधक बारी यांनी ५ लाखांवरून तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरवले. तसेच “मागच्या वेळी वकील लावून आमचे नुकसान केले, म्हणून नकारात्मक अहवाल दिला होता. पण आता अनुकूल अहवाल देतो,” असे सांगत लाचेचा पहिला हप्ता १ लाख ५० हजार रुपये आरोपी देविदास धनसिंग पाटील (वय ४४, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यांच्याकडे देण्यास सांगितले.

​त्यानुसार, आज २० मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने बी.जे. मार्केटमधील जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून दीड लाखांची रोकड स्वीकारताना खाजगी इसम देविदास पाटील याला रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​ही कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, अंमलदार हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

​


 

Tags: #curationCrimePolice
Next Post
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add