• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील शिक्षक कॉलनी परिसरात चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर (बारी) यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला आणि घरातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व खळबळीचे वातावरण पसरले आहे.


​​राजेंद्र आंबटकर हे व्यवसायाने स्टॅम्प वेंडर असून, ते आपल्या पत्नीसह गेल्या शुक्रवारी (१ मे) वैयक्तिक कामासाठी पुणे येथे गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा शिताफीने कापला आणि घरात शिरकाव केला. आज, मंगळवारी (५ मे) सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंबटकर कुटुंब पुण्याहून घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. आत प्रवेश केल्यावर घरातील सामानाची मोठी उलाढाल झालेली दिसली, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात आला.

​चोरट्यांनी घराची कसून झडती घेतली होती. विशेष म्हणजे, आंबटकर यांनी सुरक्षिततेसाठी धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले दागिनेही चोरट्यांनी शोधून काढले. यात दोन तोळ्याची मंगल पोत, दीड तोळा वजनाची चैन, ५ ग्रॅमचे झुमके असे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.


​​चोरीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पवार यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय राहुल तायडे, प्रदीप चौधरी, धनराज गुळवे, चेतन पाटील आणि शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ​तपासाला गती देण्यासाठी पोलीस कर्मचारी मनोज पाटील व नाना मोरे यांनी ‘चॅम्प’ या पोलीस श्वानाला पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ज्ञ एपीआय पांडुरंग फळ आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी घटनास्थळावरून चोरट्यांचे फिंगरप्रिंट्स (ठसे) घेतले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
​


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हळदी समारंभात 'गावठी कट्टा' घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add