जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक अनुभूती निवासी स्कूलने आयसीएसई (१० वी) आणि आयएससी (१२ वी) बोर्ड परीक्षेत देदीप्यमान यश संपादन करत आपली १०० टक्के निकालाची १९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात १० वी मध्ये पलक सुराणा ९६.८०% गुणांसह, तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर ९२.७५% गुणांसह विद्यालयात प्रथम आली आहे.

दहावीचा निकाल (ICSE): या परीक्षेस बसलेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
प्रथम: पलक सुराणा (९६.८०%)
द्वितीय: स्वयंम पाडे (९५.६०%)
तृतीय: स्तुती गर्ग (९४.८०%)

बारावीचा निकाल (ISC): बारावीच्या परीक्षेत एकूण १७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले आहे.
प्रथम: अलेफिया शाकीर (९२.७५%)
द्वितीय: ट्विंकल ललवाणी (९१.७५%)
तृतीय: आर्यमान बोथरा (८९.७५%)
अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि प्राचार्य देबासिस दास यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “संस्थापक भवरलालजी जैन यांनी पेरलेली शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवली आहेत. हा निकाल म्हणजे विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे फळ आहे,” अशा शब्दांत व्यवस्थापनाने आनंद व्यक्त केला.







