• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

​जळगाव, (प्रतिनिधी) : तरुण वयात सेवाभावी वृत्तीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘जिल्हास्तरीय युवा पुरस्कार’ यंदा पाचोरा येथील तरुण समाजसेवक कमलेश सोनवणे याला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कमलेशला या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ​कमलेश सोनवणेची ओळख एक अभ्यासू व्याख्याता आणि सक्रिय समाजसेवक म्हणून आहे. त्याने शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध संवेदनशील विषयांवर तळागाळात जाऊन कार्य केले आहे. यापूर्वी त्याने नवी दिल्ली येथील विज्ञान भवन आणि भारत मंडपम सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी आपल्या व्याख्यानाद्वारे जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.

सध्या तो स्वतःची सामाजिक संस्था चालवत असून, केंद्रीय युवा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) उपक्रमाचा तो सक्रिय स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना कमलेश म्हणाला की, “शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे सामाजिक जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यात अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात समाजकार्य करण्याचा माझा संकल्प आहे.”
​कमलेश सोनवणे याच्या या यशाबद्दल पाचोरा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

June 26, 2026
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!
क्रिडा

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group