• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जप्त करण्यात आलेले १०० कर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि २५० बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्स आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकींना मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरण्याचे प्रमाण वाढले होते. या कर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून असे १०० सायलेन्सर जप्त केले होते. यासोबतच, नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २५० फॅन्सी नंबर प्लेट्सही ताब्यात घेतल्या होत्या. या सर्व साहित्याची आज जाहीर विल्हेवाट लावण्यात आली.

​जळगाव जिल्ह्यात रस्ता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सन २०२५ च्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात झाले, त्यापैकी ४५० अपघात हे प्राणघातक ठरले असून त्यात ४८७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती पाहता, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

​विना हेल्मेट प्रवास, ट्रीपल सीट, अल्पवयीन वाहन चालक, रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे (रॉन्ग साईड) आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यापुढेही नियमितपणे आणि अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार आहे.

​जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ स्तरावर नेण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवावा आणि पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

'महादेव हॉस्पिटल'मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add