• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

​जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), जळगाव शाखेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेतील सुमारे २५०० हून अधिक नागरिकांना शीतपेय वाटप करून दिलासा दिला.

​कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आणि अभिवादनाने करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकरांनी दिलेला सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि ‘शिकाल तर टिकाल’ हा शिक्षणाचा संदेश कार्यकर्त्यांनी स्मरणात ठेवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

​सामाजिक बांधिलकीचे दर्शन..
​दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभाविपच्या वतीने सेवाकार्याचा वारसा जपण्यात आला. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, शोभायात्रेत सहभागी झालेल्या अबालवृद्धांसाठी थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने २५०० पेक्षा जास्त नागरिकांना शीतपेय वाटप केले. या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा एक उत्तम आदर्श शहरासमोर ठेवण्यात आला.

​उत्साहपूर्ण वातावरण..
​हा संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. यावेळी अभाविपचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ पुस्तकात मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Next Post
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add