• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 13, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना सिमेंट भरताना बांधकाम धसल्याने, तोल जाऊन पडल्यामुळे ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (रा. तानाजी मालुसरे नगर,असोदा रोड जळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे.

मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार सुरेश मिस्तरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सोनार हे विशाल चव्हाण आणि सुनील सपकाळे या इतर दोन मजूरांसोबत पाचव्या मजल्यावरील लिंटर माळाचे काम करत होते.

त्या ठिकाणी सिमेंट भरत असताना अचानक बांधकाम धसले आणि मुकेश यांचा तोल गेल्याने ते थेट पाचव्या मजल्यावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा जाळी किंवा इतर कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.

मयत मुकेश सोनार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगी,आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिकारी व कर्मचारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Tags: accidentCrimePolice
Next Post
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add