• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 13, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

​जळगाव, (प्रतिनिधी) : तक्रारी अर्जावर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती १ लाख रुपये स्वीकारताना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

​जळगाव येथील एका तक्रारदाराच्या मुलांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (वय ४०) यांच्याकडे होती. या अर्जात तक्रारदाराच्या मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी अहिरे यांनी सुरुवातीला २,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

​एसीबीचा सापळा आणि कारवाई..
लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी करण्यात आली. यावेळी पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी पंचांसमक्ष १,००,००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

​आज (दि. १३ एप्रिल) शनिपेठ पोलीस स्टेशनच्या परिसरातच एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १,००,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने अहिरे यांना रंगेहात ताब्यात घेतले. सध्या याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, स्मिता नवघरे, तसेच कर्मचारी सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल सूर्यवंशी यांचा सहभाग होता.
​

Tags: #corruptionCrimePolice
Next Post
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add