• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

शिवाजीनगर परिसरातील नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही अधिकारी सुस्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

​शिवाजीनगर परिसरातील नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही अधिकारी सुस्त

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरातील विविध वसाहतींमध्ये पथदिव्यांचा खेळखंडोबा सुरू असून, दिवसा दिवे सुरू राहिल्याने विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तर दुसरीकडे अनेक भागात रात्री पथदिवे बंद राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबाबत अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

​शिवाजीनगर अंतर्गत येणाऱ्या दत्त कॉलनी, उमर कॉलनी, टीचर कॉलनी, रेल्वे पूल आणि चिसतीया कॉलनी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे २४ तास सुरू आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असतानाच, दुसरीकडे काही भागांत रात्री पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

​अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कामचुकारपणा..
या संदर्भात विद्युत विभागाचे अधिकारी यांच्याकडे दहा दिवसांपूर्वीच तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, शिवाजीनगर विभागाचे संबंधित विद्युत अधिकारी गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या कामचुकारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​“विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे विजेची मोठी नासाडी होत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नसतील, तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.”
– जहांगीर अहमद खान (प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्यांक सेवा संघटना)

​

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add