• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचे काम रखडले; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपोषणाचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचे काम रखडले; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपोषणाचा इशारा

जळगाव, (प्रतिनिधी) : गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बंधाऱ्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्षा कल्पिता रमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, हे काम त्वरित सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

​जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, गिरणा धरणाखालील १६८ किलोमीटरच्या परिसरात ५० ते ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सात साखळी बंधारे बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेत राज्यपालांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाला नवीन प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर २८ डिसेंबर २०१८ रोजी ७११.१५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही मिळाली होती.

​या प्रकल्पासाठी लागणारी पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे (०.९० टीएमसी) जलविज्ञान प्रकल्प, नाशिक यांच्याकडून २०१३ मध्येच प्राप्त झाली आहेत, तसेच केंद्रीय जल आयोगाचीही मान्यता मिळाली आहे. मेहुणबारे, बहाळ (ता. चाळीसगाव), पांढरद, भडगाव (ता. भडगाव), परधाडे, कुरंगी (ता. पाचोरा) आणि कानळदा (ता. जळगाव) या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित आहेत.

​सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण असतानाही गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. यामुळे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कल्पिता पाटील यांनी दिला आहे. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवांजरी, वाय. एस. महाजन, सुनिल माळी, गौरव वाणी, प्रतिभा शिरसाठ आदींचा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Next Post
जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add