• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 31, 2026
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘जि.प. सेस २०२५-२६’ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ उच्च दर्जाच्या कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले असून, या योजनेसाठी ५३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

​जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, नगरपालिका सहआयुक्त जनार्दन पवार, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

​या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी लागणारा ५३ लक्ष इतका निधी जिल्हा परिषदेने आपल्या स्व-उत्पन्नातून उपलब्ध करून दिला आहे. बैठकीदरम्यान या योजनेचा प्रातिनिधिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले.

​या आधुनिक कर्णयंत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, त्यांच्या शालेय शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. दैनंदिन जीवनातील संवाद सुधारल्यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे सुलभ होणार आहे. ​जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
​


 

Next Post
मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

मैदानावर पत्रकार भिडले! 'प्रेस फोटोग्राफर' संघाने कोरले विजेतेपदावर नाव

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group