• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 25, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून, आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि आठ तलवारी अशी घातक शस्त्रे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

​रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका विशेष पथकाने आर.आर. शाळेच्या बाजूला असलेल्या गल्लीत सापळा रचला.
​
​पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या धीरज कोळी आणि त्याच्या एका साथीदाराला अडवले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) आणि अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) अशी सांगितली. संशयावरून त्यांच्या दुचाकीची झडती घेतली असता, दुचाकीच्या बाजूला बांधलेल्या पिशवीत एक तलवार आणि इंजिन जवळ लपवलेला एक सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा मिळून आला.


​​न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान धीरज दत्तू कोळी आणि अजय डोळे याची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडील आणखी एक गावठी व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ६० हजार रुपयांचे दोन कट्टे, ४० हजार रुपयांच्या आठ तलवार आणि १५ हजार रुपयांची दुचाकी यांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी धीरज कोळी याच्यावर यापूर्वी धरणगाव आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यात मारामारी, आर्म्स ॲक्ट आणि खूनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हा गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

​ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाळ देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
​


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!

'जय श्रीराम'च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add