• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

​जळगाव, (प्रतिनिधी) : पोहता येत नसतानाही नदीच्या पात्रात मृत्यूशी झुंज देणाऱ्या चार मुलांसाठी १४ वर्षीय उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील हा प्रत्यक्ष ‘देवदूत’ ठरला. ओमने दाखवलेल्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार अल्पवयीन मुले (वय १६) अनेर नदीत स्नानासाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने ही चौघेही बुडू लागली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या ओम पाटील याने क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या डोहात उडी घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने एकामागून एक अशा चौघांचेही प्राण वाचवले.

​ओम सध्या गावातीलच विकास विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील आणि आई सारलाबाई हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाला मुलांच्या शिक्षणाची मोठी चिंता होती. ओमचा मोठा भाऊ ११ वीत शिकत असून, आर्थिक ओढाताणीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येत होते. ​ओमने दाखवलेले शौर्य हे केवळ कौतुकास्पद नसून प्रेरणादायी आहे. परिस्थितीमुळे अशा गुणवान मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी जैन इरिगेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

“संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारांचा वारसा जैन परिवारावर आहे. संस्कारशील विचारांचा आधार या कार्याला आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जैन इरिगेशन कायमच अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.”

अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड

Next Post
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add