• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये राबविण्यात येत असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नशिराबाद पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह रंगेहात अटक केली आहे.

​दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची अळी, नशिराबाद) हा गावठी कट्टा घेऊन बस स्थानक परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

​मिळालेल्या माहितीची शहानिशा करून सपोनि नारखेडे यांनी तात्काळ शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास संशयित आरोपीवर अचानक छापा टाकला आणि त्यास जागीच ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ​एक लोखंडी चंदेरी रंगाचा, काळ्या प्लास्टिक मुठीचा गावठी कट्टा आणि ​एक डमी गावठी कट्टा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ​या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करत आहेत.

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, सफौ राजेश मेंढे, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोकॉ भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भूषण पाटील आणि विजय अहिरे यांच्या पथकाने केली आहे.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add