• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर येथील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा ५ लाख २७ हजार रुपये लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धुळे येथील एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून दीड लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

​दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास अमळनेर येथील ‘लामा जिनिंग’चे मालक यतिन विनोद कोठारी हे आपल्या दुचाकीवरून ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड घेऊन जात होते. पिंपळे रोडवर तिघा अज्ञात इसमांनी त्यांना अडवून, डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांच्याकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासचक्र फिरवली. या तपासात सदर गुन्हा धुळ्यातील सराईत गुन्हेगार मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

​अटक करण्यात आलेला मनोज मोकळ (वय २६, रा. दंडेवाला नगर, मोहाडी, जि. धुळे) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्याने जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख रुपयांची बॅग लंपास केली होती. विशेष म्हणजे, त्यावेळेस देखील एल.सी.बी.नेच त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रविण मांडोळे, राहुल कोळी, दीपक चौधरी, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांच्या पथकाने केली. ​सध्या फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा
क्रिडा

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

May 8, 2026
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

May 8, 2026
एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन
सामाजिक

एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन

May 8, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
आरोग्य

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिका सतर्क; उपमहापौरांनी घेतली तातडीची आढावा बैठक
आरोग्य

बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिका सतर्क; उपमहापौरांनी घेतली तातडीची आढावा बैठक

May 7, 2026
हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू
जळगाव जिल्हा

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू

May 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group