• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

​जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुप्त कलागुणांना आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (१० मार्च) सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे विविध स्पर्धांचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जळगाव शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सीमा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटन सत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा मंगला नगरकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अंजली पाटील यांनी केले, तर देवानंदा साखला यांनी सूत्रसंचालन केले.

​विविध विषयांवरील स्पर्धांनी वेधले लक्ष..
यावेळी वकृत्व, भारुड गायन, लघुनाटिका आणि रिल्स अशा चार प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धेसाठी ‘स्त्रीवादी राजकारण’, ‘महिलांचा राजकीय प्रवास’ आणि ‘एआय: शाप की वरदान’ असे समकालीन विषय देण्यात आले होते. लघुनाटिकेत ‘सती ते प्रगती’, ‘मी नागरिक मी बाई’ आणि ‘सरपंच बाई’ या विषयांतून स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडण्यात आले. भारुड गायन स्पर्धेतून ‘महिला आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ यावर प्रबोधन करण्यात आले, तर रिल्स स्पर्धेसाठी ‘आपला अभिमान: भारतीय संविधान’ हा विषय ठेवण्यात आला होता.

​स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
​वकृत्व स्पर्धा: प्रथम-अंकिता गाजरे, द्वितीय- रागिणी सोनवणे, तृतीय- मानसी शिंदे.
​भारुड गायन: प्रथम- भैरवी ग्रुप, द्वितीय- मेघ क्षत्रिय महिला मंडळ, तृतीय- एस.एस. मणियार लॉ कॉलेज.
​लघुनाटिका: प्रथम- वनिता विश्व महिला मंडळ, द्वितीय- जी.डी. बेंडाळे महाविद्यालय, तृतीय- के.सी.ई. महाविद्यालय.
​रिल्स स्पर्धा: प्रथम- शितल ठाकूर, द्वितीय- प्रेरणा चौधरी, तृतीय- पूजा आंबेकर व वनिता विश्व महिला मंडळ.

​परीक्षक व पारितोषिक वितरण..
स्पर्धेचे परीक्षण प्रांजली रस्से, विशाखा देशमुख, हनुमान सुरवसे, चिंतामण पाटील, दीप्ती बारी आणि अजय पाटील यांनी केले. विजेत्यांना शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन राजकमल पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा मंगला नगरकर, सचिव कमल पाटील, प्रकल्प प्रमुख अंजली पाटील, उपाध्यक्ष देवानंदा सांखला, छाया गडे, पुष्पा साळवे, चंद्रकला परदेशी, राजकमल पाटील, भारती पाथरकर, ज्योत्स्ना बऱ्हाटे, हेमा रोकडे, श्रद्धा रेखा राजेंद्र, निखिल पाटील, सुश्मिता भालेराव आदींनी परिश्रम घेतले.
​


 

Tags: #jalgaon_city#womensday
Next Post
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add