• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिंनींनी सहभाग घेत बहारदार कातकरी नृत्य सादर केले.

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विद्यार्थिंनीं व वादकांनी नाशिकमधील विश्व मराठी संमेलनात जळगावचा झेंडा दिमाखात रोवला. या कलावंतांना बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत व प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून ही संधी मिळाली होती.

या मिळालेल्या संधीचे आपल्या जोशपूर्ण नृत्याने या विद्यार्थिंनींनी सोने केले. सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिंनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण, सचिन महाजन यांच्यासह संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतूक आहे.


 

Tags: #anubhuti
Next Post
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add