• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी वाकोड गावाजवळ संयुक्तपणे मोठी कारवाई करत तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम गांजा आणि दोन आलिशान कार असा एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कारमधून गांजाची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व पहूर पोलीस स्टेशनच्या पथकाने वाकोड गावाच्या पुढे सापळा लावून संशयित कारचा पाठलाग केला आणि ती ताब्यात घेतली.

​कारची तपासणी केली असता पोलिसांना त्यात तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम वजनाचा गांजा आढळला, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १२ लाख ७४ हजार २०० रुपये आहे. पोलिसांनी गांजासह गुन्ह्यात वापरलेली ७ लाख रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची इनोव्हा आणि ३ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती रिट्झ कार, असा एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. त्यात सागर संजय इंगवले (रा. नवी मुंबई), इरफान अक्रम शेख (रा. गोरेगाव, मुंबई), आणि अमन ताज खान (रा. वर्सोवा, मुंबई) यांचा समावेश असून, त्यांना गांजा पुरवल्याप्रकरणी नईम शेख याकुब, आबीद खान मेहमूद खान आणि तोहसिफ खान रसूल खान (सर्व रा. धुळे) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि प्रमोद कठोरे, पीएसआय शरद बागल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ​या पथकात ​सहा.फौ. अतुल वंजारी, ​​पो.हे.कॉ. विजय पाटील,​अक्रम शेख, ​नितीन बाविस्कर, ​पो.ना.अ. किशोर पाटील, ​पो.अ. रवींद्र कापडणे, ​राहुल रगड्ये, ​अजय पाटील, ​चापोशि प्रविण हिवराळे, ​दर्शन ठाकणे, ​ज्ञानेश्वर ठाकरे, ​दिपक पाटील, ​राहुल पाटील, ​सदिप धनगर, ​विनोद पाटील, ​चापोशि राहुल जोहरे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत.


 

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add