• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 1, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथे आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाले असून, एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​अकुलखेडा येथील रहिवासी अनिता पाटील (वय अंदाजे ३२) आणि शिरपूर येथील देवानंद धनगर यांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने देवानंदसोबतचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला टाळत असल्याने देवानंदच्या मनात राग धुमसत होता. याच रागातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

​शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तिने तो ढकलून उघडला. समोरचे दृश्य पाहताच तिची वाचाच बसली. आई अनिता आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले होते. घाबरलेल्या मुलीने वडील जगदीश पाटील यांना फोन करून माहिती दिली. जगदीश पाटील यांनी घरी धाव घेत तातडीने पोलिसांना पाचारण केले.

​घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, देवानंदने आधी अनितावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्याच शस्त्राने स्वतःला संपवले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवानंदकडे बंदूक कुठून आली? तो ती शिरपूरवरून घेऊन आला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. ​या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शांत असलेल्या अकुलखेडा गावात सध्या शोककळा पसरली आहे.

​

Tags: #instagram#lovechopdaCrimeJalgaonPolice
Next Post
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group