• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

​जळगाव, (प्रतिनिधी)  : जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुनीता येवले लिखित ‘मह्य आंगन’ या लेवा गणबोलीतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

​याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “साहित्य निर्मितीत स्थानिक बोलींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवोदित कवी आणि लेखकांनी आपल्या मातृभाषेतूनच अधिक प्रगल्भपणे अभिव्यक्त होण्याची गरज आहे.”
​
​ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे आणि जयश्री काळवीट यांनी ‘मह्य आंगन’मधील भावविश्वाचे कौतुक केले. जयश्री काळवीट म्हणाल्या की, “या संग्रहात ग्रामीण संस्कृतीचे आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण उमटले असून, लेवा गणबोलीतील अमूल्य शब्दांचा हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.”

​कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या भाषणात मातृभाषेच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची गरज व्यक्त केली. त्यांनी विशेषतः पुस्तकातील कवितांसोबतच लेवा गणबोलीतील शब्दांचा प्रमाणभाषेत दिलेला अर्थ आणि काव्यानुरूप रेखाटलेल्या सुंदर चित्रांचे कौतुक केले. बोली भाषांमधून अशाच प्रकारचे दर्जेदार लिखाण होत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

​​या सोहळ्यास ‘आम्ही सिद्धलेखिका’ संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा. संध्या महाजन, तुषार वाघुळदे, श्री. झांबरे, पी. झेड. नारखेडे, रंजना भंगाळे, विनोद अढळके, प्रेम बडगुजर, भूषण अमोदेकर, तृप्ती शिर्के, ज्योती खरे यांसह विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सोनवणे यांनी केले, तर आभार महेश सूर्यवंशी यांनी मानले.

​

ताज्या बातम्या

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जळगाव जिल्हा

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

February 25, 2026
जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू
गुन्हे

जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group