• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बापानेच संपवले ३ दिवसांच्या लेकीचे आयुष्य; मुलाच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 26, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बापानेच संपवले ३ दिवसांच्या लेकीचे आयुष्य; मुलाच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या

​जामनेर, (प्रतिनिधी) : विज्ञानाच्या युगात आजही मुलगा-मुलगी हा भेदभाव किती टोकाचा असू शकतो, याचा एक थरकाप उडवणारा प्रकार जामनेर तालुक्यातील मोराड येथे समोर आला आहे. चौथ्या वेळीही मुलगीच झाली या रागातून एका निर्दयी पित्याने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) याला आधीच तीन मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता, मात्र १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही, या वैफल्यातून आणि रागातून कृष्णाने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे अघोरी पाऊल उचलले. त्याने घरातील लाकडी पाटाने अवघ्या तीन दिवसांच्या राधिका नावाच्या बालिकेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्या निष्पाप बालिकेचा जागीच मृत्यू झाला.

​या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पिता कृष्णा राठोड याला २५ डिसेंबर रोजी रात्री ८:५१ वाजता अटक करण्यात आली आहे. ​सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. एका बापानेच आपल्या पोटच्या गोळ्याचा असा क्रूर अंत केल्याने समाजातील ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेची दाहकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेने मोराड परिसरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: CrimeJalgaonJamnerPolice
Next Post
जळगाव मनपा महायुतीची चर्चा फिस्कटली; भाजप ७५ जागांवर स्वबळावर लढणार?

जळगाव मनपा महायुतीची चर्चा फिस्कटली; भाजप ७५ जागांवर स्वबळावर लढणार?

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add