• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर पोलिसांची कारवाई! सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोन सराईत चोरटे गजाआड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 4, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रावेर पोलिसांची कारवाई! सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोन सराईत चोरटे गजाआड

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल केली आहे. ०१ डिसेंबर रोजी रावेर-वाघोड रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची पोत (मंगळसूत्र) हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यात ​अजय गजानन बेलदार (वय २०, रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) आणि ​नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०, रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

​पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग घेतला. आरोपींनी गुन्हा करताना विना नंबर प्लेटच्या पल्सर दुचाकीचा वापर केला होता. माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तळ ठोकून पाठलाग करत दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.

यावेळी ​गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर दुचाकी आणि १३.३०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत रु. १,७५,०००/-) असा ​एकूण रु. २,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी रावेर येथील गुन्ह्यासह कुऱ्हा काकोडा बस थांब्याजवळ झालेल्या आणखी एका सोनसाखळी चोरीची कबुली दिली आहे.

पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पो. अधिक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग अनिल बडगुजर, रावेर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीत पो.उप. निरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे, अतुल गाडीलोहार, सायबर पोलिस स्टेशनचे मिलींद जाधव, गौरव पाटील यांचा सहभाग होता. पुढील तपास पो. उप. निरीक्षक तुषार पाटील करत आहेत.

Tags: #chainthiefCrimePoliceRaver
Next Post
बससेवेच्या दुरावस्थेविरुद्ध ‘अभाविप’चे निवेदन! तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

बससेवेच्या दुरावस्थेविरुद्ध 'अभाविप'चे निवेदन! तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group