धरणगाव, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था (iCONGO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nation) यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या “कर्मवीर चक्र” पुरस्कारासाठी धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय, तांत्रिक, सामाजिक आणि वैयक्तिक कौशल्याची दखल घेत iCONGO आणि UN तर्फे दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात लोणारी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन या जागतिक दर्जाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोविड काळातील उत्कृष्ट कार्य..
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी म्हणून काम करताना, विशेषतः कोविड महामारीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वी पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागामार्फत राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्याच बरोबर लोणारी यांनी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.
मिलिंद लोणारी यांचा जागतिक दर्जाच्या ‘कर्मवीर चक्र’ पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे त्यांच्यावर आरोग्य सेवेतील मित्रमंडळी तसेच इतरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








