• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील

​प्रचार रॅली आणि कॉर्नर सभेत शहरवासियांशी संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील

​एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रंगत जसजशी वाढत आहे, तसतसा महायुतीचा प्रचारही जोर धरू लागला आहे. याच अनुषंगाने आज एरंडोल शहरातील प्रभाग क्र. १, ९ व १० मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अमोलदादा पाटील यांनी भव्य रॅली काढत जनतेच्या भेटी-गाठी घेतल्या आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच, ओम नगर आणि भोई गल्ली परिसरातील श्रीराम मंदिराजवळ कॉर्नर सभेने त्यांनी शहरवासियांशी संवाद साधला.

​यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील यांनी एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर आपण २०० हून अधिक कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. “यात नुसतीच कामे करायची म्हणून कामे केली नाहीत, तर यासोबत नवनवीन संकल्पना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला,” असे ते म्हणाले. ‘पुस्तकांचा बगीचा’ ही संकल्पना राज्यभर चर्चेला आली आणि त्यामुळे एरंडोल नगरीचे नाव सर्वत्र गाजले, असे त्यांनी नमूद केले.

​ज्या अपेक्षेने माय-बाप जनतेने आपल्याला निवडून दिले, त्या आशा-अपेक्षा जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापुढेही सातत्याने करत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ​आमदार अमोलदादा पाटील यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासह प्रभाग क्र. १ अ च्या उमेदवार कल्पना मनोज पाटील, प्रभाग क्र. १ ब चे उमेदवार अभिजित राजेंद्र पाटील, प्रभाग क्र. ९ ब चे उमेदवार नितेश कैलास चौधरी, प्रभाग क्र. १० अ च्या उमेदवार मनकरनाबाई चैतराम चौधरी आणि प्रभाग क्र. १० ब चे उमेदवार नय्युम खान दलशेर खान यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

​याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, युवासेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग क्र. ५ ब चे उमेदवार प्रा. मनोज पाटील, धरणगांव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रवि जाधव, पं. स. माजी सभापती दादाजी पाटील, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, किशोर निंबाळकर, अमित पाटील, समाधान पाटील, एस.आर. पाटील, धरणगांव बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक किरण पाटील, खडके येथील जगदीश पाटील, शहरप्रमुख बबलु चौधरी यांच्यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​


 

Tags: #politicalerandol
Next Post
जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा

जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add