• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील महानगरपालिकेच्या बहुचर्चित आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आली. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात चिठ्ठीद्वारे ही आरक्षण सोडत जाहीर होताच, नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. सोडतीच्या अंतिम चित्रानंतर, अखेर कोणत्याही प्रस्थापिताला धक्का बसला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरक्षण सोडतीदरम्यान व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी, नगर सचिव मनोज शर्मा आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जसजशी आरक्षणाची चिठ्ठी निघत होती, तसतशी राजकीय कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची धडधड वाढत होती.

या आरक्षण सोडतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे, १९ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये ‘ड’ हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे अनेक प्रस्थापित माजी नगरसेवकांचे फावणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सोडतीमुळे जळगाव मनपा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. परिणामी, सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता तिकिटांसाठीची रस्सीखेच शिगेला पोहोचणार आहे, तर दुसरीकडे बंडखोरीला उत येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Tags: #jalgaon_city#municipalcorporationElection
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त 'रंगभरण' स्पर्धा उत्साहात!

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका: महामंडळाचे आवाहन
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका: महामंडळाचे आवाहन

November 12, 2025
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त
खान्देश

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त

November 12, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!

November 12, 2025
जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

November 11, 2025
गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!
खान्देश

गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!

November 11, 2025
मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ
जळगाव जिल्हा

मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ

November 10, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group