जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध आहे. या जळगाव शहरात नव्याने उभारलेल्या “अयांश”च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत झाले.
 अशोक लेलँड लिमिटेडचे एलसीव्ही प्रमुख विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शोरूमची पाहणी करून कौतुक केले. या उद्घाटन सोहळ्याला आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 अयांश ऑटो मोबाईल्समध्ये ग्राहकांना विक्रीची सेवा दिली जाणार असून एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे स्थित ई-८ येथे अशोक लेलँड वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनाचे ओरिजिनल सुटे भाग अशा सर्व सुविधा मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अयांश ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी प्रस्तावनेतून केला. यावेळी अशोक लेलँड, नागपूर येथील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सुदीप चौहान, अभिषेक नाडकर्णी, हेमंत उपाध्याय, कैलास घुगे, किरण मोरे, शिवराम मालखेडकर, अजय सिंह यांचा सत्कार करण्यात आला.

 ग्राहकांच्या वतीने प्रशांत महालकर, शरद कुलकर्णी यांनी मनोगतमधून, अयांश ऑटोमोबाईलच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळेला तीन भाग्यवान ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते बंपर प्राईज देण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते परिसरात काही ग्राहकांना वाहनाची डिलिव्हरी देण्यात आली. यावेळी आ राजूमामा भोळे व प्रतापराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतमधून त्यांनी, मंत्री परिवाराला सदिच्छा देत, संचालक यश मंत्री हे तरुण तडफदार असे औद्योगिक क्षेत्रातील नेतृत्व आहे. त्यांनी उत्कृष्ट प्रचाराद्वारे जळगावकरांना विश्वास दिला असल्याचे सांगितले. तसेच शहरात उद्घाटनाला सेलिब्रिटींमध्ये मराठी सेलिब्रिटीला महत्त्व दिल्याने आपण मराठी माणसाला पुढे करत आहोत याबद्दल कौतुक केले.

 अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले की, जळगावकरांकडून मला नेहमीच प्रेम मिळते. अशोक लेलँडची सर्व वाहने अत्यंत विश्वासू आणि मजबूत अशी आहेत. सुरक्षा दलात देखील अशोक लेलँडची वाहने वापरली जातात, असे सांगितले. तर यश सुनील मंत्री यांचे कौतुक करून त्यांच्या अयांश ऑटोमोबाईलला त्यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष स्थानावरून विप्लव शाह यांनी सांगितले की, सकाळी धुळ्यामध्ये व आता जळगावात अशोक लेलँडच्या नवीन शोरूमचे उद्घाटन झाले. ग्राहकांना अतिशय उत्तम सुविधा अशोक लेलँडकडून मिळणार आहे.

वाहन खरेदी, फायनान्स तसेच किमती देखील परवडणारे आहेत. देशात वाहन सेवेत सर्वात विश्वासनीय असे नाव आहे. मायलेजमध्ये अव्वल आहे. आमचे ग्राहक हे ८ ते १२ तास वाहनावर घालवतात. त्यामुळे हे वाहन त्यांचे दुसरे घर असल्याचे आम्ही समजतो, असेही विप्लव शाह यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार सरिता खाचणे यांनी केले. कार्यक्रमाला जळगाव शहरातून नागरिकांची प्रचंड उपस्थित होती. सुरुवातीला तुतारीच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी उद्घाटन केले.
Video