• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुन्या वादातून जळगावमध्ये तरुणाची निर्घृण हत्या!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जुन्या वादातून जळगावमध्ये तरुणाची निर्घृण हत्या!

दसऱ्याच्याच रात्री घटना घडल्याने परिसरात हळहळ

जळगाव: (प्रतिनिधी) : शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाची दोघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय-२७, रा. कासमवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना याचा त्याच्या घरासमोर राहणाऱ्या काही तरुणांशी जुना वाद होता.

शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नाना हा कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना, जुन्या वादातून त्याच्या घरासमोर राहणाऱ्या दोन जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी नाना जाधव याच्या पोटावर आणि मांडीवर गंभीर वार केले, ज्यामुळे तो जागीच गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील नाना उर्फ ज्ञानेश्वरला त्याच्या मित्रांनी तातडीने दुचाकी वाहनावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरू असताना, तासाभरातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तपास सुरू करत एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे सत्र थांबत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
सी.ए. विद्यार्थ्यांसाठी ‘पर्सनल ब्रँडिंग’ कार्यशाळा यशस्वी; स्नेहा टाओरी यांचे मार्गदर्शन

सी.ए. विद्यार्थ्यांसाठी 'पर्सनल ब्रँडिंग' कार्यशाळा यशस्वी; स्नेहा टाओरी यांचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add