• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in आरोग्य
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस,आषाढी एकादशी व रक्षाबंधनाच्या निमित्ताने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे आजपासून ‘भव्य आरोग्य संपदा शिबिराला’ प्रारंभ झाला आहे. हे शिबिर २१ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिबिरात डॉ. युवराज बढे (छाती व फुफुस रोग तज्ञ) आणि डॉ. रोशन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, श्वसनाचे विकार, दमा, क्षयरोग, सीओपीडी तसेच इतर विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

या शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, २ डी इको कार्डिओग्राफी, ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणार्‍या रुग्णांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांनी आयुष्मान कार्ड सोबत आणावे. कार्ड नसल्यास मूळ रेशन कार्ड व आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांवरही शिबिरादरम्यान सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच शिबिरादरम्यान आवश्यक तपासण्या, ऑपरेशन्स व भरती होणार्‍या रुग्णांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून, गरजू नागरिकांनी या आरोग्य संपदा शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

Next Post
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add