• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते

'लाॕकडाऊन डायरी' चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 19, 2021
in जळगाव जिल्हा
0
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते

जळगाव दि.19 – आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते, यातूनच वैचारिक समृद्धी घडते. ‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले.

याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले. कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते.

माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ स्वरूपातील जी चित्रकला होती ती गुहेत होती, ती बहरत गेली आणि त्यातूनच कलावंत घडत गेला ,माणुसकीचा संस्कारही वाढत गेला. संस्कृती संस्कारीत करण्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे ती मानवाला समृद्ध करते आणि बौद्धिक विकासही करते असे हरून पटेल यांनी म्हटले.

चित्रकार राजू बाविस्कर यांनी भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कलादालनामध्ये ‘लाॕकडाउन डायरी’ या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली. कोणत्याही शहराची सांस्कृतिक ओळख ही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने जळगाव शहराची सांस्कृतिक ओळख हे भवरलालजी जैन व अशोकभाऊ जैन यांच्या प्रोत्साहनामुळे होत असल्याचे गौरवोद्गार राजू बाविस्कर यांनी काढणे.

‘लाॕकडाउन डायरी’ या प्रदर्शनाची थीम सांगताना विजय जैन यांनी सामान्य माणसांचा आशावाद असणारी ही कोरोना काळातील चित्रे असल्याचे सांगितले. कला आणि माणूस हे नातं जोडताना हेमंत अलोने यांनी शहराची प्रगती हे कलावंतांवरही अवलंबून असते. यातून माणूस व कलेचे नातं जोडता येऊ शकते. शहर सांस्कृतिक समृद्ध करण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,

आनंद, समाधान आणि नवनिर्मिती करायचे असेल तर प्रत्येक जण कलाकाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे आणि हे काम जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि आता अशोक जैन हे नेहमी करीत असल्याचे हेमंत अलोने म्हणाले. चित्र सूचणे आणि ते साकारणे हा प्रवास म्हणजे मनाचे प्रतिबिंब होय,असे कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सांगत चित्र साक्षरता विषयावर भाष्य केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी कला आणि संस्कृती या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.


 

Next Post
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची तालुका बैठक संपन्न

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची तालुका बैठक संपन्न

ताज्या बातम्या

भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक
गुन्हे

भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक

August 15, 2026
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 15, 2026
एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी
खान्देश

एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

August 15, 2026
शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली
जळगाव जिल्हा

शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली

August 15, 2026
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन
जळगाव जिल्हा

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

August 15, 2026
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन
खान्देश

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add