जळगाव, (प्रतिनिधी) : विशेष सरकारी वकील आणि नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेले पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा जळगावमध्ये भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा २७ जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजता, शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. “पद्मश्री ॲड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती, जळगाव” यांच्यातर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार असून प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमास विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती..
कार्यक्रमात खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. चंद्रकांत पाटील, आ. अमोल पाटील, आ. अमोल जावळे, विधान परिषद आ. एकनाथराव खडसे, आ.किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, यांचा समावेश आहे. तसेच, विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे हे देखील उपस्थित राहतील.
नागरी सत्कार समारंभ सायंकाळी ५ वाजता..
हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून, ॲड. उज्वल निकम यांना सन्मानित करण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “पद्मश्री ॲड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती, जळगाव” यांनी केले आहे. या समितीमध्ये अशोक जैन (समिती अध्यक्ष) यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर सहभागी आहेत.