जळगाव, (प्रतिनिधी) : समस्त लाड वंजारी समाज श्री राम मंदिर संस्था मेहरूण आणि वंजारी युवा संघटना जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येत्या २७ जुलै २०२५ रोजी समस्त लाडवंजारी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका (मार्कशीट) त्वरित जमा कराव्यात.
समाजातील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.